डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन






Deccan Maratha Education Association

गंगाराम भाऊ म्हस्के परिचय

गंगाराम भाऊ म्हस्के परिचय

  1. गंगाराम् चा जन्म
    ओढा गावात् भास्करराव म्हस्के कुटुंबासहित शेतिवर् उदरनिर्वाह् करत होते. त्यांच्या पोटी ईसवीसन 1831 मध्ये गंगाराम नामक बालकाचा जन्म झाला. इ.स. 1834-35 च्या दरम्यान म्हस्के कुटुंब रंगेराव ओढे गावातून पुणे येथे आले. भास्करराव म्हस्के पुण्यातिल् शिक्षना च्या बाबतीत होणाऱ्या सर्व सुधारणांशी नक्कीच अवघत होते, त्यामुळेच त्यांनी धार्मिक क्षेत्र नाशिक जवळ असताना उदरनिर्वाह आणि मुलाचे शिक्षण ह्या दुहेरी उद्देशाने पुठे येथे स्थलांतर केले. : गंगाराम च्या पूर्व पिढीतील कोणीही शाळेत गेले नव्हते . त्यांच्या घराण्यातील पहिलीच व्यक्ती शाळेत पाठवायची असल्याने , त्या गोष्टीचे सर्वांनाच अप्रूप होते.
    त्यांनी 'मिशनस्कुल' मध्ये जाऊन त्यांचे नावं नोंदविले. गंगाराम शाळेत जाऊ लागला. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे त्यांनी रात्री ससून हॉस्पिटल च्या दिव्याखाली अभ्यास केला. मित्रांच्या पुस्तकांचा आधार घेत, दिव्यान् खाली अभ्यास करत गंगाराम ने शिक्षण क्रम सुरु ठेवला होता. यामध्ये शिक्षणाबद्दलची त्यांची कळकळ , तसेच आपण शिक्षण घेतले पाहिजे याविषयी चे ठाम असल्यामुळे , कोणत्याही परिस्थिती मध्ये गंगाराम ने शिक्षण सोडले नाही. पुढे इ.स. 1847-48 मध्ये गंगाराम म्हस्के कुटुंबातील पहिली व्यक्ती म्हणून मॅट्रिक उत्तीर्ण झाले. हे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले.