डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची स्थापना
लॉर्ड रिपन यांनी इ.स. १८८२ मध्ये हिंदुस्थानातील शिक्षणविषयक प्रगतीची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन स्थापन केले. त्यांच्या उदारमतवादी धोरणामुळे सर्व लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेणान्या सुधारकांच्या आशा पल्लवित झाल्या. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण जाईल असा आशावाद त्यांना वाटत होता. गंगारामभाऊ भोवताली घडणाऱ्या अशा घटना-प्रसंगाशी नेहमीच सजग होते. 'याच वेळी पुण्यात पुढारलेल्या वर्गातील काही पदवीधरांनी न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्यूट व नूतन मराठी विद्यालय अशा खासगी संस्था स्थापन केल्या.याच सुमारास जोतीराव फुले, रा. ब लोखंडे, भाऊपाटील डुंबरे, कृष्णराव पांडुरंग भालेकर, गंगारामभाऊ म्हस्के वकील यांनी मागासलेल्या वर्गात कर्तव्यजागृतीस आरंभ केला. पुणे व मुंबई येथे सत्यशोधक समाज व दीनबंधु सार्वजनिक सभा अशा संस्था स्थापन करण्यात मनात घोळू लागला.मराठा समाजात विद्येचा प्रसार न होण्यास त्यांची अनास्था व दारिद्र्य ही मुख्य कारणे आहेत हे गंगारामभाऊंच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी वैयक्तिकरीत्या इ.स. १९८३ पासूनच हुशार व होतकरू मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपाने द्रव्यसाह्य सुरू केले. गंगारामभाऊ कोणतीही संस्था स्थापन करण्यापूर्वी तिचा पाया मजबूत करत. भविष्यातील त्या संस्थेची उपयोगिता दूरदृष्टीने तपासून पाहत.त्यामुळे स्थापन केलेली संस्था लोकोपयोगी ठरून अनेक वर्ष कार्यरत राहत असे. संस्था स्थापनेविषयी तावडे म्हणतात,'गंगारामभाऊ म्हस्के यांनी अविश्रांत श्रम करून आपल्या काही मित्रमंडळींच्या व इतर समाजातील थोर मंडळींच्या साह्याने व सहानुभूतीने डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन पुणे ही संस्था स्थापन केली.