संस्थेची उद्दिष्टे


डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन

Deccan Maratha Education Association

संस्थेची उद्दिष्टे :-

डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, पुणे-४११००२

संस्थेची उद्दिष्टे :-


(अ)मराठा समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना पदवी, पदव्युत्तर व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे,

(ब) विद्यार्थी वसतिगृह बांधणे व ते चालविणे

(क) संस्थेतर्फे सर्व माध्यमाच्या पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये तसेच, तांत्रिक, यांत्रिक, वैद्यकिय, शेती व संशोधन इत्यादी शैक्षणिक कोर्सेस व इतर आधुनिक काळाच्या गरजेनुसार सर्व व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करणे.

(ड) संस्थेतर्फे समाजात समाजिक, धार्मिक एकोपा वाढविण्याचे दृष्टीने आवश्यक ते सर्व सामाजिक व सांस्कृतीक उपक्रम राबविणे/करणे. सर्वधर्म समभाव समाजामध्ये वाढविण्याकरिता आवश्यक ते सर्व उपक्रम करणे व समाजातील विशेष व कर्तृत्व संपन्न व्यक्तींना योग्य तो पुरस्कार देवून सन्मानीत करणे..

(इ) आधुनिक जगातील गरजेनुसार व समाजिक हित विचारात घेवून शिशु, बाल, ज्येष्ठ संगोपन केंद्र (Care Taker Center) सुरू करणे व त्याव्दारे गरजुंना आवश्यक त्या सेवा पुरविणे. तसेच योग्य त्या ठिकाणी बाल सुधारणा केंद्र व वृद्धाश्रम सुरू करणे.

(ई) संस्थेच्या ध्येयधोरणाशी समानता असलेल्या नोंदणीकृत इतर धर्मादाय संस्थांना आवश्यक ती आर्थिक व इतर मदत करणे व स्विकारणे. त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील गरीब व दुर्बल घटकांना गरजेनुसार आर्थिक व वैद्यकिय मदत करणे.

(उ) विद्यार्थ्याचा शारीरिक व मानसीक विकास घडविण्यासाठी विविध खेळांचे/स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना विविध खेळांचे मार्गदर्शन करणे, त्याकामी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, सोईसुविधा उपलब्ध करून देणे, खेळाची मैदाणे तयार करणे तसेच गरीब विद्यार्थ्यांना विविध खेळांसाठी आर्थिक मदत करणे..Designed & Developed by Aryan Technologies